केळी लागवड
Banana Crop : केळी हे महत्त्वाचे नगदी पीक. क्षेत्र आणि उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा नंबर लागतो. तुमच्याकडे खोल काळी जमीन आणि जर मुबलक पाणी असेल तर या पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. लागवडीचा हंगाम केळीची लागवड दोन हंगामात केली जाते. मृग हंगामात म्हणजे जून जुलै या महिन्यात आणि कांदे बाग केळीची लागवड ऑक्टोबर महिन्यात करतात. कांदे बाग लागवडीपासून मिळणारे उत्पादन मृगबाग लागवडीपासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा कमी असत, पण बाजारभाव मात्र चांगला मिळतो. म्हणजे जास्त उत्पादनासाठी केळी जून जुलै या महिन्यात लावावी. आणि भाव चांगला पाहिजे असेल तर ऑक्टोबर महिन्यात. लागवडीपासून योग्य व्यवस्थापन ठेवले तर चांगले उत्पादन मिळत. जमीन, वाण आणि अंतर केळीसाठी मध्यम ते भारी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची खोली ६० सेंटीमीटर तर जमिनीचा सामू हा ६.५ ते ८ दरम्यान असावा. हे जाणून घेण्यासाठी केळी लागवडीपुर्वी माती परीक्षण जरुन कराव. क्षारयुक्त, चोपण आणि चुनखडीयुक्त जमिनीत केळीची लागवड करू नये. केळ...