सर्पदंश 🐍

साप चावला , काय करणार..
पावसाळा सुरू झाला की सर्पदंश चे प्रकार वाढतात 
सापाच्या बिळात पाणी शिरल्याने साप बाहेर पडतात.
सर्पदंश झाल्यावर काय करायचे: 


• सर्पदंश झाल्यावर घाबरून जाऊ नका .शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि त्याला धीर द्या.

• दंश झालेल्या भागाला जास्त हालचाल करणे टाळा.

• जखमेला स्वच्छ पाण्याने धुवा .

• दंश झालेल्या व्यक्तीला जवळच्या शासकीय किंवा खासगी रुग्णालयात त्वरित घेऊन जा .

• कोणत्याही प्रकारची पारंपरिक औषधे किंवा इतर
उपचार करू नये .

असा ओळखा दंश :

° विषारी सापाच्या दशानंतर , दंश झालेल्या ठिकाणी सूज , वेदना , रक्ताच्या उलट्या , चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे .

° विषारी सापाच्या दंशावर अँटीवेनम हे प्रभावी ओषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या.

°दंश नंतर साप मृतावस्थेत सापडल्यास तो डॉक्टरांना दाखवण्यास न्या, त्यामुळे साप विषारी आहे का हे कळेल.



ही काळजी घ्या 

° गवतातून किंवा इतर ठिकाणी चालताना नेहमी जास्त उंचीचे बुट घाला .

° रात्रीच्या वेळी बाहेर जाताना किंवा घरातून बाहेर पडताना नेहमी दिवा किंवा टॉर्चचा वापर करा .

° घराच्या आसपास चाची स्वच्छ ठेवा .

° घराच्या आजूबाजूला लाकडी सामान किंवा इतर वस्तूंचा साठा करू नका .

° घराच्या खिडक्या आणि दरवाज्यावर झाडाच्या फांद्या येणार नाहीत याची काळजी घ्या.

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही सर्व जग आहात...
काळजी घ्या🥰
Agricos 💚🌱 
✍️Vaishnavi Nimkar 

Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

रानभाज्या