बीज प्रक्रिया , किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी , बोंडअळी व्यवस्थापन

बिज प्रक्रिया :

✓ पिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढून मर रोग कमी होते .

✓ बियाण्याची उगवण क्षमता वाढून एकसारखी उगवण होते .

✓ बियान्यास पाण्याचा तान सहन करण्याची शक्ती मिळते .

✓ जमिनीतून व बियान्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो 

✓ पिकाच्या उत्पादनात वाढ होते 

✓ बीजप्रकियेंसाठी कमी खर्च येतो त्यामुळे ही किड / रोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे.

किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी :


✓फवारणी करताना मोज़े , पाय मोज़े , संरक्षण कपडे , नाकावरील मास्क व शक्य झाल्यास सेफ्टी
किट वापरावी .

✓ फवारणी शक्यतो हवेचा प्रवाह मंद असताना करावी व हवेचा \प्रवाहाची दिशेचा अंदाज घेऊन करावी 

✓ किटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहिती 
ख़बरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे .

✓ तननाशके फवारणीचा पंप चुकूनही किटकनाशके फवारणीसाठी वापरू नये .

✓ फवारणीसाठी वापरलेले स्प्रे पंप , टाकी , बकेट इत्यादी वापरलेले कपडे स्वच्छ धुवावे .

बोंडअळी व्यवस्थापन 

✓ जमीनीची खोल नागरणी करणे 

✓ कपाशी सोबत नॉन बीटी कपाशीची लागवड करावी .

✓ कपाशी कुळातील जसे भेंडी , वांगी च्या जागेवर कपाशी लागवड करू नये .

✓ माती परीक्षणानुसार खतांचा वापर करावा नत्र खताच्या वापर कमी करावा .

✓ मिश्र पिक पध्दतीचा अवलंब करावा .

✓ बोंडअळी ग्रस्त डोमकळीया तोडून नष्ट कराव्या .

✓ कपाशीला पहिले फूल दिसताच प्रकाश सापला
( लाइट ट्रैप ) हेक्टरी २ लावावेत .

✓ कपाशीला फुले येण्यास सुरवात झाल्यावर दर १५ दिवसांनी अळीनाशकांची फवारणी करावी .

✓ कपाशीची फरदड घेण्याचे शेतकऱ्यांनी टाळावे व हंगाम संपल्यावर कपाशीच्या अवषेशाची विल्हेवाट लावणे .

✍️ वैष्णवी निमकर (गुंजी,धामणगांव रेल्वे , अमरावती )
7666441799
























Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

रानभाज्या

सर्पदंश 🐍