संवर्धन नैसर्गिक सेंद्रिय खत
संवर्धन नैसर्गिक सेंद्रिय खत
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते , विषारी रसायने , कृत्रिम औषधे यांचा वापर करून उत्पादन घेत आहेत . यामुळे सुरुवातीस उत्पादन वाढल्यासारखे वाटले तरी केलेला खर्च व उत्त्पन यांचा हिशोब करता उत्पन वाढलेले नाही हे लक्षात येते. मात्र खारपड व नापीक होणे , परोपजीवी व मित्रकिडींचा नाश होणे , पक्षी व इतर सरपटणारे कीटाकभक्षक जीव इ . संख्या कमी होणे , कीड आटोक्यात न येणे , विषारी अंश पिकामध्ये व चारा रुपातुन प्राणीमात्रांच्या शरीरात जाणे व त्यामुळे नवनवीन गंभीर आजार होणे इ . भयानक दुष्परिणाम पिके व प्राणीमात्रावर दिसून आले आहे .
या सर्व समस्याना तोंड देण्यासाठी कृषिटेक उद्योग समुहाकडून नैसर्गिक खतांची व औषधाची मालिका उपलब्ध करून देण्यात आली असून याचा लाभ व अनुभव महाराष्ट्रासह अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे व त्यांची यशस्वीपणे वाटचाल मोठ्या प्रमाणात सुरु आहे .
संवर्धन हे नीमपेंड , करंजपेंड , महुवापेंड ,
हळद , मेंढ़ीखत व इतर नैसर्गिक खनिजे यापासून बनविले असून यामध्ये नत्र , स्फुरद , पालाश व इतर सुक्ष्म अन्नद्रवे उदा. तांबे , कैल्शियम ,
मँगनीज , झिक , मैग्नीशियम व फॉस्फेट योग्य प्रमाणात आहेत .
✓संवर्धन वापरण्याची पध्दत :
१) सरासरी एकरी १०० ते ५०० किलो . जमिनीचा पोत व पिकांचा प्रकार पाहून खत घालावे .
२) पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी जमीन तयार करताना खताचा एक डोस मातीमध्ये मिसळेल असा द्यावा व दूसरा डोस उगवणी , लागण
झाल्यानंतर , किंवा मशागत करतेवेली पिकानुसार
द्यावा .
३) सोबत वेगवेगळ्या पिकांसाठी मात्रा व वेळापत्रक देण्यास आलेले आहे , त्याप्रमाणे उपयोग करावा .
✓संवर्धनचा योग्य प्रमाणात वापर केल्याने खालील फायदे मिळतात
१) संवर्धन नीमपेंड , करंजपेंड य महुवापेंड पावडर इ . मुळे जमीनीतून येणारी की उदा. सुत्रकूर्मी , वाळवी , हूमणी इ . किडीपासून व मूळकुज , रोपमर इ .रोगांपासून पिकांचा पूर्ण बचाव होतो . त्यामुळे किटकनाशकाचा वापर फारच कमी होतो पर्यायाने महागड्या व विषारी कीटनाशकंवरील खर्च कमी होतो .
२) संवर्धन मधील हळद पावडर , महुवा पेंड , साड पेंड , कुसुम कली पेंड इ .मुळे बुरशीजन्य रोग , विषाणुजन्य रोगाचे नियंत्रण होते .
३) संवर्धन मधील मेंढीखत , शिंपला पावडर यामुळे पिकास भरपूर प्रमाणात कैल्शियम उपलब्ध होतो
४) ट्रायकोडर्मा , मायसिलीयम , अज़ोटोबैक्टेर , पी. एस . बी , झिंक सोलुबलायसर , पोटश
मोबिलायझर यांच्यामुळे नत्र , स्फुरद , पालाश , झिंक योग्य प्रमाणात पिकाला उपलब्ध होतात .
५) संवर्धन सामू ६.५ असल्याने क्षारयुक्त पडीत जमिनीत त्याचा योग्य वापर नापिक जमिनीचे सुपीक जमीनीमध्ये रूपांतर होण्यास मदत होते .
६) संवर्धनमध्ये आर्गेनिक कार्बन १६% पर्यन्त व जीवाणु ३× १० प्रतिग्रम असल्यामुळे जमीनीमध्ये जीवाणूंची संख्या परोपजीवी किड , मित्रकीडी व् ह्यूमस झपाट्याने वाढून जमीन जिवंत व् सुपीक बनते व जमिनीची जलसंधारणक्षमता वाढते त्यामुळे निसर्गचक्र पुनशच सुरु होते .
७) योग्य व समतोल प्रमाणात अन्नद्रव , ह्यूमस व जीवाणू यामुळे पिकांचे पोषण व वाढ अत्यंत नैसर्गिकरित्या होते , फुले व् फळ ग़ळतीचे प्रमाण कमी होते , झाडांचे आयुष्मान वाढते , फळाना नैसर्गिक रंग व स्वाद येतो व टीकऊपना वाढतो
७) संवर्धनचा वापर सलग केल्यास दोन तीन वर्षात किटकनाशके , बुरशीनाशके , संजीवके व रासायनिक खतावरील खर्च कमी होऊन सतत उत्पादनात वाढ व दर्जा सुधारलेला दिसून येतो .
बायोडायनामिक कल्चरमुळे फळांची चकाकी व जमिनीची सुपिकता सुधारण्यास मदत होते .
वेगवेगळ्या पिकांना संवर्धनखत वापरण्याची पध्दत व
वेळापत्रक :
१) ऊस
लागणीसाठी जमीन तयार करताना सरीमध्ये ४०० ते ५०० किलो व नंतर भर घालतेवेळी एकरी ४०० ते ५०० किलो .
२) आंबा : जूनमध्ये प्रतीकलम ५ ते २५ किलो प्रतीझाड़ , झाडांचे वय आकार व् उत्पादन पाहून डोस ठरवावा .
३) द्राक्षे : एप्रिल छाटणीनंतर एकदा व ऑक्टोबर छाटणीनंतर एकदा प्रतिएकर ४०० ते ५०० किलो
प्रमाणे दोन डोस द्यावेत .
४) डाळिंब : बहार धरताना ५ ते ६ बैग प्रति एकरी , आणि आणि त्यानंतर ७० दिवसांनी ५ ते ६ बैग प्रति एकरी वापरावे .
५) संत्रा , मोसंबी , लिंबू , चिक्कू - २ ते ४ किलो वयोमानानुसार प्रति झाड .
६) केळ - लागवड करतेवेळी प्रथम १ किलो खत प्रति खुंटाना वापरावे .
७) सुपारी , काजु : जूनमध्ये प्रतीझाड़ ३ ते ५ किलो प्रमाणे खत वापरावे .
८) आले व हळद : एकरी १ टनापर्यंत वापरावे .
९) कापुस - पेरणीबरोबर एकरी १०० ते १५० किलो
१०) धान्य , कडधान्य , तेलबिया , सोयाबीन : पेरणीबरोबर एकरी १०० ते १५० किलो .
११) स्ट्रॉबेरी - ऑगस्ट सेप्टेंबर मध्ये लागवड करताना एकरी २०० ते ३०० किलो व डिसेम्बर मध्ये पुन्हा २०० किलो एकरी वापरावे
१२) टोमॅटो , वांगी , मिरची , फ्लावर आणि पालेभाज्या : सरया करताना व कांदा , लसूण , तंबाखू , बटाटा , लागण करताना एकरी २०० ते ३०० किलो
१३) गवारी , भेंडी , दोडका , भोपळा , कार्ले , कलिंगड़ व इतर सर्व वेल वर्गीय :
पेरणी अथवा लागवड करताना २०० ते ३०० किलो
१४) भातशेती : पेरणी बरोबर एकरी १०० ते १५० किलो
(Gunji, Dhamangaon Railway, Amravati)
Contact No: 7666441799
Comments
Post a Comment