सहकारातून समृद्धी आत्मनिर्भर शेती , आत्मनिर्भर भारत इफको ननो यूरिया व डीएपी ( द्रवरूप )चा वादा , किंमत कमी जास्त फायदा

इफको ननो यूरिया व डीएपी ( द्रवरूप ) खते :
ननो यूरिया व डीएपी हे एक आधुनिक नत्र व् स्फुरद युक्त द्रवरूप खत आहेत . जी पिकांच्या वाढीसाठी व 
विकासासाठी आवश्यक असणारे नत्र व स्फुरद हे मुख्य अन्नद्रवे पुरवतात . जगात सर्वप्रथम ननो यूरिया व डीएपी विकसित करण्याचा मान इफकोकडे जातो .
✓ ननो यूरिया म्हणजे काय ?
ननो यूरिया हे एक द्रवरूप खत असून त्यामध्ये ४ टक्के नत्र ननो कणांच्या स्वरूपात असतो . त्यामधील ननो नत्र कणांचा आकार हा ३० ते ५० ननोमीटर इतका असतो .

ननो यूरियाची वैशिष्ट्य :
ननो युरिया मध्ये नत्राचे कण हे अतिसूक्ष्म असल्यामुळे ते एकसंघ असतात तसेच त्यांचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे पारंपरिक युरिया पेक्षा १००००पट जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता ९० % असते जी पारंपरिक युरिया मध्ये ३० ते ५० % असते इफको ननो युरिया मधील नत्र हे उपलब्ध स्वरूपातील असल्यामुळे ते पिकांची नत्राची गरज प्रभावीपणे भागवते .

✓ननो डीएपी म्हणजे काय ?
ननो डीएपी हे एक नवीन खत आहे जे 
(१९८५) अंतर्गत २ मार्च २०२३ रोजी भारत 
सरकारने अधिसूचित केले आहे . त्यात नत्र ८% आणि स्फुरद १६% आहे .

✓ननो डीएपी मध्ये कणांचा आकार १०० ननोमीटर पेक्षा कमी आहे . या अद्वितीय गुणधर्मामुळे बियाने / मुळाच्या आत किंवा पानांवर उपलब्ध रंध्र छिद्रातून आणि वनस्पतींच्या इतर छिद्रातून सहज प्रवेश करू शकतात .

✓ ननो डीएपी पानांवर व बियाणांवर / मुळांवर व्यवस्थित पणे पसरतो परिणाम स्वरूप बियानांची जोम शक्ती वाढते , हरितद्रव्य जास्त बनते , प्रकाश संश्लेषण अधिक होते , पिकांची गुणवत्ता व पीक उत्पादनात वाढ होते .
✓ननो युरिया व् ननो डीएपी चे फायदे :

•ननो युरिया व ननो डीएपीच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते , खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकयांच्या एकूण , उत्पान्नत वाढ होते . पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते .

• ननो युरियाची एक बाटली (५०० मिली ) आणि युरियाची गोनी (४५ किलो) यांची कार्यक्षमता समान आहे . त्यामुळे पारंपरिक यूरिया खतांवरील शेतकऱ्यांचे अवलंबत्व कमी होते .
पारम्परिक युरियाच्या तुलनेत ननो युरिया कमी लागतो .

• पारंपरिक डीएपीच्या तुलनेत डीएपी कमी लागतो . त्यामुळे शेतकऱ्यांची साठवणूक व वाहतूक यावरचा खर्च कमी होतो . 

• ननो युरिया ननो डीएपीच्या वापरामुळे हवा , पाणी आणि जमीन यांची हानी थांबते .
ग्लोबल वॉर्मिंग साठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे उत्सर्जन कमी होते .

• ननो युरिया / ननो डीएपी हा सर्व पिकांसाठी उपलब्ध नत्र आणि स्फुरदचा उत्तम स्त्रोत आहे . याच्या वापरामुळे उभ्या पिकांमधील नत्र आणि स्फुरदची कमतरता दूर होते .

• ननो युरिया /ननो डीएपी हे पारंपरिक यूरिया/ डीएपी पेक्षा स्वस्त आहे आणि शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आहे 

• याच्या उपयोगामुळे रासायनिक खतांचा अतिवापारामुळे होणारे माती , हवा आणि पाण्याचे प्रदुषण कमी होते .

• जैव - सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल , विषमुक्त , शाष्वत शेतीसाठी योग्य आहे .

• कृषी उत्पादनात व शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ 

• पिकाच्या गुणवत्तेत वाढ 

• किटक व रोगांचा प्रभाव कमी होतो .

•ननो डीएपी उपयोग सीड प्राइमर म्हणून लवकर अंकुरण आणि जोमाने वाढ , पिकाची वाढ , आणि गुणवत्ता सहायक ठरते .
✍️वैष्णवी निमकर (गुंजी धामणगांव रेल्वे )
7666441799

Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

रानभाज्या

सर्पदंश 🐍