उडीद -मूग व्यवस्थापन

उडीद व मूग या कडधान्याचा भविष्याचा विचार करता ही पीके फायद्याची ठरू शकतात . लवकर येतात , उत्पादन खर्च कमी , रबी पिकासाठी शेत लवकर खाली या फायद्यांसोबतच काही अडचणीसुद्धा आहेत त्या म्हणजे पेरणीस जास्त उशीर झाल्यास उत्पादनात मोठी घट येते . 
वाणाची निवड :
बुस्टर २००३-२ , टी .ए .आर .एम-०२ , ९८ कोपरगाव मूग व उडदामध्ये टीएयू -१ , 
पी .के . व्ही .-१५ किंवा खाजगी कंपनीच्या जाती 
पेराव्यात .
एकरी बियाणे , बीजप्रक्रिया :
उडीद व मूग दोन्ही पिकांचे ५ किलो बियाणे प्रति 
एकरप्रमाणे पेरावे .
पेरणीपूर्वी बियान्याला ३ ग्राम रोको नंतर रिहांश ३ मिली प्रति किलो व नंतर गरजेनुसार रायझोबियम व ट्रायकोडर्मा या जीवाणूंची बीजप्रक्रिया करावी . मान्सून वेळेत आल्यास जून महिन्यात पेरणी झाल्यास उत्पादनात वाढ होते . सर्वात पहिले मूग व उडदाची पेरणी करावी .

•खत व्यवस्थापन :
फार लवकर येणारी पिके असल्याने पेरणीसोबत 
२०:२०:०:१३ किंवा २४:२४:०० किंवा डी. ए . पी . पेरावे . नंतर खत देण्याची आवश्यकता नाही.

•आंतरमशागत व तणनाशकाचा वापर : 
फूल लागण्यापूर्वी डवरणी करावी . गरजेनुसार निंदण करावे किंवा जमिनीत ओलावा असताना 
इमथिथायपर तण १-२ इंचाचे असताना फवारावे .

•कीड व रोग व्यवस्थापन :
रसशोषक किडींपैकी मावा , भुंगे , पांढरी माशी ही कीड उडीद , मूगावर आढळते . पैकी मावा सुरवातीला आढळतो . शेंड्यावर व शेंड्याच्या पानातील रस शोषल्याने वाढ खुंटते . पांढरी माशी , यलो मोझक प्रसार करते . म्हणून दोन्ही किडींना वेळीच नियंत्रित करावे . त्यासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा डायमेथोएट फवारावे .
फुलोरा अवस्था असल्यास १२:६१+ झेप
 व शेंगा अवस्था असल्यास बीग -बी + भरारी द्यावे .
भूरी रोग : 
पानांवर पांढऱ्या रंगाची बुरशी आढळते . तीव्रता जास्त असल्यास पानांवर , फांद्यावर , फुलांवर सगळीकडे पसरते व पाने , फुले गळून जातात . याच्या नियंत्रणासाठी टोपाझ -५ मिली / सल्फर -४० ग्रामपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी 

✍️Agricos 🌾🌱
Vaishnavi Nimkar 

Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

रानभाज्या

सर्पदंश 🐍