सातारा बनतोय फ्रूट बास्केट ; स्ट्रॉबेरी , ड्रॅगन फ्रूट अन् बरच काही
सातारा जिल्हा निसर्गरम्य डोंगररांगा , ऐतिहासिक आणि समृद्ध शेतीसाठी ओळखला जातो . या जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे आणि येथील सुपीक जमीन विविध प्रकारच्या पिकांच्या लागवडीसाठी आणि अनुकूल आहे .









ऊस , भात, ज्वारी ,बाजरी ,गहू ही प्रमुख पिके असली तरी अलीकडच्या काही वर्षात येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून पारंपरिक पिकांबरोबरच फळवगाही पिकवू लागला आहे . त्यामुळे सातारा जिल्हा फ्रूट बास्केट म्हणून नावारूपास येऊ लागला आहे .
• महाबळेश्र्वरची स्ट्रॉबेरी
महाबळेश्र्वरचे येथील तीन हजार एकर क्षेत्रावर दरवषी स्ट्रॉबेरी लागवड केली जाते. मलबेरी, रासबेरी, लाल मुळा, गाजर, फरसबी, तसेच काही प्रमाणात लाल पेरुदेखील येथे पिकवला जातो.
सफरचंदाची लागवड करून या नव्या शेतीचा प्रयोगही यशस्वी केला आहे.
ड्रॅगन फ्रुटची शेती
कमी पाण्यावर येणारे फळ म्हणजे ड्रॅगन फ्रूट , दुष्काळी खटाव , कोरेगाव , तसेच खंडाळा तालुक्यातील काही शेतकरी ड्रॅगन फ्रूटची लागवड करून चांगले उत्पादन घेत आहे. एकेकाळी बाहेरून येणाऱ्या या उत्पादन घेतले जात आहे.
धुमावाडीची फळे:
फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे गाव राज्यातील पहिलं फळाच गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. या गावात सफरचंद काजू, लीची , मोसबी , फणस , स्टार फ्रूट , वॉटर ॲपल अशा विविध फळांची लागवड केली जाते .
फलटनचे डाळिंब , सीताफळ :
फलटण तालूक्याचे मुख्य पीक जरी ऊस असले, तरी अलीकडच्या काही वर्षात येथील शेतकरी डाळींब व सिताफळ लागवडीला प्राधान्य देऊ लागले आहेत .
माण तालुक्यात फळ लागवड :
माण तालुका दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जात असला , शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि शासनाच्या योजनाचा लाभ घेऊन फळांची लागवड करत आहेत .
✍️शेतकरीकन्या
वैष्णवी निमकर💚🌱
Comments
Post a Comment