गांडूळखत
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. गांडूळाला ‘शेतकरी मित्र’ असे ही संबोधले जाते. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला चोवीस तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून ते वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात.
•गांडूळखताचे फायदे-
१.जमिनीचा पोत सुधारतो.
२.मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल होतो.
३.जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
४.जमिनीची धूप कमी होते.
५.बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
६.जमिनीचा सामू (पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
७.गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
८.गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
९.जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत वाढ होते.
१०.गांडुळ खतामध्ये नत्र १.८ ते २.०%, स्फुरद ०.६५ ते ०.७५ आणि पालाश ०.५० ते ०.६० % प्रमाण असते.
• जागेची निवड:
1) गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी.
2) खड्ड्याच्या जवळपास मोठी वृक्ष/झाडे नसावीत. कारण झाडांची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात.
3)गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते. त्यासाठी छप्पर किंवा शेड करणे आवश्यक आहे.
•गांडूळखत तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत.
१.ढीग
२.खड्डा
मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी.
या शेडची लांबी दोन ढिगांसाठी 4.25 मीटर तर चार ढिगांसाठी 7.50 मीटर असावी.
निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छपरासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा.
गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी.
१.ढीग पद्धत
ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मी. लांबीचे आणि 90 सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत.
साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावीत. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सियस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.
२.खड्डा पद्धत
या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि खोली 60 सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त 50 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्यासाठी वापर करावा.
•गांडूळ खत (gandul khat) तयार होण्यास लागणारा कालावधी –
गांडुळाचा वापर करून गांडुळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.
•गांडूळ खताची किंमत (gandul khat price)-
साधारणता गांडूळ खताची दहा किलोची बॅग आपल्याला 150-160 रुपयांपर्यंत मिळते.
गांडुळखतामध्ये असणारे अन्नद्रव्याचे प्रमाण हे कमी किंवा जास्त असू शकते कारण हे खत करतांना वापरले जाणारे अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ आणि तयार करण्याची पध्दत यावर अवलंबून असते. होते. सरदचे गांडुळ खत कोणत्याही प्रकारच्या जमिनी, पिके, आणि हवामानात अत्यंत उपयोगी आहे. म्हणून गांडुळ खत एक उत्तम सेंद्रिय खत आहे.
गांडूळ खत वेगळे करण्याची पद्धत / गांडूळ खत वेगळे कसे करावे ?
गांडूळ खत तयार झाल्यानंतर गांडुळे व खत वेगळे करण्यासाठी उन्हामध्ये ताडपत्री किंवा गोणपाट अंथरून त्यावर गांडूळ खताचा ढीग करावा. जेणेकरून उन्हामुळे खतातील गांडुळे तळाशी जातात व सहजपणे आपण वरील खत आणि गांडुळे वेगळे करू शकतो. शक्यतो गांडूळ आणि खत वेगळे करताना अवजारांचा वापर करू नये. उदा. कुदळी, टिकाव, फावडे, खुरपे कारण यांच्यामुळे गांडूळांना इजा पोहोचते. फारच गरज भासल्यास हाताने तुम्ही गांडोळे वेगळे करू शकता.
•गांडुळाचे खाद्य :
सर्व सजीवांप्रमाणे गांडुळाच्याही खाण्यामध्ये आवडीनिवडी असतात. त्यांच्या आवडीच्या खाद्यामध्ये गांडुळांची वाढ व प्रजोत्पादन झपाट्याने होते. झाडांची प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुद्धा खत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत व सेंद्रिय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरून गांडूळ खत तयार करता येते.
•गांडूळ खताचे फायदे Advantages of Vermicompost :
गांडूळ खतामुळे किंवा गांडूळामुळे जमिनीची पोत सुधारते.
मातीच्या कणांचा रचनेत उपयुक्त बदल घडविले जातात. ज्यामुळे माती भुसभुशीत होते.
गांडूळांच्या विष्ठेला “ह्युमस” असे म्हणतात. ज्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारे स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म द्रव्य मोठ्या प्रमाणात आढळतात.
जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. ज्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि पिकांच्या मुळांना याचा चांगला फायदा होतो.
जमिनीत पाणी धरून ठेवण्याचे क्षमता वाढते व पाण्याचे बाष्पीभवन फारच कमी प्रमाणात होते.
जमिनीचा सामू योग्य प्रमाणात राखला जातो.
गांडूळ खतामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते.
गांडूळ खत व कंपोस्ट / शेणखत यातील फरक :
•गांडूळ खत कंपोस्ट / शेणखत
गांडूळखत लवकर तयार होते. (गांडुळे गादी वाफ्यावर स्थिरावल्यावर २-३ आठवडे) मंदगतीने तयार होते. (जवळजवळ ४ महिने लागतात.)
घाण वास, माश्या, डास यांचा उपद्रव नाही. आरोग्याला अपायकारक नाही. घाण वास, माश्या, डास यांचा उपद्रव संभवतो.
जागा कमी लागते. जागा जास्त लागते.
४ x १ x ७५ फूट आकाराच्या गादीवाफ्यापासून (म्हणजेच ३०० घनफूट) दर पंधरा दिवसाला ३ टन खत मिळते. ३ x १० x १० फूट आकाराच्या खड्ड्यापासून दर महिन्याने १० टन खत मिळते.
ऊर्जा, गांडूळखत, द्रवरुप खत मिळते. कंपोस्ट व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळत नाहीत.
हेक्टरी मात्रा ५ टन लागते. हेक्टरी मात्रा १२.५ टन लागते
तापमान फार वाढत नसल्यामुळे जिवाणूंचे कार्य जोमात होते. तापमान वाढत असल्यामुळे जिवाणूंचे कार्य मंद असते.
नत्र उपलब्ध २.५ ते ३ टक्के नत्र उपलब्ध ०.५ ते १.५ टक्के
स्फूरद उपलब्ध १.५ ते २ टक्के स्फूरद उपलब्ध ०.५ ते ०.९ टक्के
पालाश उपलब्ध १.५ ते २ टक्के पालाश उपलब्ध १.२ ते १.४ टक्के
सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात.
गांडुळांच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते. कोणतेही अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही.
•Vermicompost Price/ गांडूळ खत किंमत
गांडूळ खत तयार झाल्यानंतर प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांडूळ खतापासून किती किंमत मिळणार. एकंदरीत जर आपण मोजमाप केलं तर दीड टनाच्या गांडूळ खतापासून आपण सुमारे बाराशे किलो इतका गांडूळ खत तयार करू शकतो. गांडूळ खताची विक्री किंमत साधारणपणे प्रति किलो आठ रुपये ते दहा रुपये पर्यंत आहे. सर्वसाधारणपणे तुम्हाला एका बेड पासून किमान दहा हजार ते बारा हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. जर एका बेडचा पूर्ण खर्च वजा केला तर सुमारे 45 दिवसांमध्ये एका बेड मागे तुम्हाला दोन ते अडीच हजार रुपये शिल्लक राहतात. अशाप्रकारे तुम्ही गांडूळ खताचा व्यवसाय करून चांगल्या प्रमाणात फायदा मिळवू शकता आणि स्वतःची आर्थिक स्थिती सुधारू शकता.
Agricos💚
✍️Vaishnavi Nimkar
B.Sc.( Hons) Agriculture
Comments
Post a Comment