तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेंडा खुडणे
तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेंडा खुडणे
शेंडा खुडणीचे महत्त्व:
✓उत्पादन वाढते:
शेंडा खुडल्याने पिकाला फांद्या फुटतात, ज्यामुळे झाडाची वाढ होते आणि उत्पादन वाढते.
✓फुटवा वाढतो:
शेंडा खुडणीमुळे मुख्य खोडाला जोडलेल्या फांद्या फुटतात, ज्यामुळे पिकाला अधिक फुटवा मिळतो.
✓फुलधारणा वाढते:
शेंडा खुडणी केल्याने फुलांची संख्या वाढते, ज्याचा थेट परिणाम शेंगांच्या संख्येवर आणि एकूण उत्पादनावर होतो.
१)पहिली शेंडा खुडणी
३० ते ३५ दिवसात करावी
दुसरी शेंडा खुडणी :
६० ते ६५ दिवसात
शेंडा खुडणी कधी आणि कशी करावी?
वेळ:
पिकाची अवस्था:
शेंडा खुडणी ही पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, म्हणजेच पीक लहान असताना करणे अधिक फायद्याचे असते.
✓तुरीचे पीक लागवडीनंतर साधारणपणे ३० व ५५ दिवसांनी खुडणी करावी.
✓काही ठिकाणी हे काम ३५ आणि ७० दिवसांनीही केले जाते.
कृती:
हातांनी शेंड्यापासून साधारणपणे २ ते ३ इंच भाग अलगदपणे खुडावा.
खुडणीनंतर काय करावे?
✓खुडणी केल्यानंतर लगेच स्फुरदयुक्त (P) खते दिल्यास शेंगा लागण्यास मदत होते आणि उत्पादनात चांगली वाढ होते.
या पद्धतीमुळे पीक मर रोगापासून वाचण्यास आणि चांगले उत्पादन देण्यास मदत होते.
कृषीकन्या
वैष्णवी निमकर
B.Sc.( Hons) Agriculture 💚 🚩
नाद एकच शेती💚
शेतीविना नाही जगताला गती
वापर तुझी तू मानसा थोडी मती
प्राण ओत शेतीत उंचावेल स्थिती
नोकरीची कुठे लावतोय तरुणा बत्ती
माय तुझी कल्पतरू माती
कष्ट करून शेतीत मिळव तू ख्याती
जीवनाचा शिल्पकार शेतकरी सर्व तुझ्या हाती
मातीविना होईल तुझ्या जीवाची रेती
✍️कृषीकन्या वैष्णवी निमकर
B.Sc (Hons) Agriculture
Comments
Post a Comment