पाण्याचा निचरा करण्यासाठी पद्धती:

पाण्याचा निचरा करण्यासाठी पद्धती:

उताराच्या आडवी पेरणी (Contour Ploughing):

उताराच्या आडवे पेरणी केल्याने उताराच्या आडव्या रेषा तयार होतात. या रेषांमुळे पावसाचे पाणी जमिनीवर साचते आणि त्याचा उतार कमी होतो, ज्यामुळे पाणी जमिनीत मुरते आणि पाणी वाहून जाण्यापासून रोखले जाते. यामुळे जलसंधारण होते आणि मातीची धूप कमी होते

चर काढणे (Ditch Method):
शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उताराच्या दिशेने समांतर चर (नाल्या) काढता येतात. या चरमुळे पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते आणि ते मुख्य सांडवाटे शेताबाहेर काढले जाते. 


पाइपद्वारे निचरा (Pipe Drainage):
✓ज्या ठिकाणी चर काढणे शक्य नसते, त्या ठिकाणी पाइपद्वारे निचरा प्रणालीचा वापर केला जातो. 
✓या पद्धतीत डबक्यांपासून मुख्य सांडनालीपर्यंत उताराने पाइप बसवले जातात, जे अतिरिक्त पाणी बाहेर काढायला मदत करतात. 

सखल जमिनीची विभागणी:
✓जमिनीला सखल भागातून दोन किंवा अधिक भागांमध्ये विभागून अतिरिक्त पाणी एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याची सोय केली जाते. 

✓यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाणी एका ठिकाणी जमा न होता ते हळूहळू बाहेर पडते. 

खरीप पिकांसाठी फायदे: 

✓अतिरिक्त पाण्याची समस्या कमी होते:
खरीप पिकांच्या काळात अतिवृष्टीमुळे पिकात पाणी साचण्याचा धोका असतो, ज्यामुळे पिकांचे नुकसान होते. या तंत्रज्ञानामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो.

✓जलसंधारणात सुधारणा:
उताराच्या आडव्या पेरणीमुळे पाणी जमिनीत साचून राहते आणि मातीची धूप कमी होते, ज्यामुळे जलसंधारण होते.

✓उत्पादनात वाढ:
योग्य निचरा झाल्यामुळे आणि जलसंधारण सुधारल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते.

✓खर्च कमी होतो:
काही तंत्रज्ञानामुळे खते व बियाणांच्या वापरात बचत होते, ज्यामुळे शेतीचा खर्च कमी होतो.
या तंत्रांचा वापर करून खरीप पिकांचे उत्पादन वाढवता येते आणि शेतीतील पाण्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते. 

निचरा नियोजनाच्या पद्धती:

✓वाहिन्या तयार करणे:
बागेच्या किंवा शेताच्या भोवती खंदक तयार करून अतिरिक्त पाणी बाहेर काढता येते. 

✓भूमिगत पाइप निचरा पद्धत:
जमिनीखाली सच्छिद्र पाइप टाकून अतिरिक्त पाण्याचा निचरा केला जातो, ही पद्धत क्षारपड व पाणथळ जमिनींसाठी फायदेशीर आहे. 

✓मातीची सुधारणा:
मातीत कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत वापरून मातीची रचना आणि निचरा क्षमता वाढवता येते. 

जमिनीचा योग्य उतार:
जमीन शेतीसाठी एक टक्का उतार देऊन शेतीच्या आडव्या दिशेने पाणी वाहून नेण्यासाठी चर तयार केले जातात. 

✓पिकांची फेरपालट:
पिकांच्या फेरपालटीत हिरवळीची पिके घेतल्यास जमिनीची सुपीकता वाढते. 

✍️कृषीकन्या वैष्णवी निमकर 
Bsc agriculture 
नाद एकच शेती❤️

Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

रानभाज्या

सर्पदंश 🐍