सोयाबीन
सोयाबीनची कमी उत्पाद्कता असण्याची प्रमुख कारणे
✓आधुनिक लगवड़ तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे
✓सुधारीत जातींचा वापर न करणे
✓दर हेक्टरी झाडांचीसंख्या न राखणे
✓बीजाक्रिया न करण, उगवणशक्तीची तपसणीं न करणे
✓योग्य खत मात्रांचा शिफारशीनुसार वापर न करणे
✓तण तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त वेळेवर न करणे
✓आंतरपीक पद्धतींचा वापर नकरणे
कोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन पुष्कळदा सलग पीक म्हणून घेतात, परंतु आपण सलग पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
•बेभरवशाचे तसेच कमी पर्जन्यमान व ज्या ठिकाणी दुबार पीक घेऊ शकत नाही अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीपासून शाश्वत व स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक असते.
•प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्याही एका पिकाचे उत्पन्न हमखास मिळते.
•आंतरपिकात सोयाबीनसारख्या द्विदलवर्गीय पिकाचा समावेश असल्यास हवेतील नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.
•आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास तणांच्या वाढीस आळा बसतो. तसेच रोग व किडींचे प्रमाण कमी आढळून येते.
•जनावरांकरिता सकस चारा उपलब्ध होतो.
•आंतरपिकातील सोयाबीन सारखे नगदी पीक
•शेतक-यांच्या आर्थिक अडचणी दूर करु शकते.
तूर + सोयाबीन सारख्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास देशातील डाळ व तेलवर्गीय पिकांचे उत्पादन वाढून तेल व डाळीची कमतरता भरून निघेल.
आंतरपीक पद्धती
1)तूर + सोयाबीन (१:२)
2)कपाशी + सोयाबीन (१:१) .
3)सोयाबीन + भुईमूग (१४, १:६) .
4)सोयाबीन + ज्वारी (१:२, २:२) .
5)सोयाबीन + बाजरी (२:४, २:६)
कीड व रोग व्यवस्थापन
सोयाबीनवर महाराष्ट्रात आढळणा-या किडीच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावी
अ) कोड नियंत्रण
✓खोड माशी
क्लोरोपायरीफॉस २0 टक्के इसी १.५ लि. प्रति है. किंवा ट्रायझेफॉस ४० टक्के इसी ८oo मि.ली. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी आणि पीक फुलो-यात असताना ५oo-७o० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
✓पाने पोखरणारी अळी
पाण्यात मिसळणारी ५० टक्के कार्बारील भुकटी प्रती हेक्टरी २ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावी.
✓पाने खाणा-या आणि पाने गुंडाळणा-या अळ्या
क्रिनॉलफॉस २५ इसी १.५ ली.
ट्रायझोफॉस ४o इसी ८oo मि.ली.
मेथोमिल ४0 टक्के एसपी १ कि. ग्रैं.
क्लोरोपायरीफॉस २o इसी १.५ ली.
इथोफेनप्रॉक्स १o इसी १ ली.
इंडोक्झाकार्ब 300 मि.ली.
लम्बडा सायद्देलोश्चिन ५ टक्के सीएस ३oo मि.ली.
स्पिनोसॅड ४५ एसी १२५ मि.ली.
इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के डब्लुजी १५० ग्रॅम यापैकी एका किटकनाशकाचा प्रती हेक्टरी ५००-७०० लीटर पाण्यात मिसळून Tap on a clip to paste it in the text box.
#फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा.
रस शोषणा-या किडी (मावा, तुडतुडे, हिरवा ढेकूण इ.)
मेथिल डिमेटॉन २५ इसी ६oo मि.ली. किंवा फॉसफॉमिडॉन ८५ इसी २oo मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ एस सी ८oo मि.ली. यापैकी एका कीटकनाशकांचा प्रती हेक्टरी ५00 लीटर पाण्यात मिसळून फवारा द्यावा.
हुमणी
✓पावसाळ्याच्या सुरुवातीस कडुनिंब व बाभळीच्या झाडावर किटकनाशकांचा फवारा देऊन मुंगेच्यांचा नाश करावा.
✓शेतात शेणखत पसरण्यापूर्वी त्यात असलेल्या हुमणीच्या अंडी व अळ्यांचा नाश करण्यासाठी १० टक्के फॉलिडॉल भुकटी मिसळावी.
✓ शेतात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्यास ५ टक्के क्लोरेडेन किंवा ५ टक्के हेप्टाक्लोर भुकटी प्रती हेक्टरी ६५ केिली जमिनीत मिसळावी.
ब) रोग नियंत्रण
या पिकावर केवडा, तांबेरा, देवी, मूळकुजव्या इ. रोग येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी
पहिली
फवारणी
हेक्झाकोनेझोल ५ इसी १ लिटर (प्रतिबंधात्मक) आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास
दुसरी फवारणी प्रॉपिकोनेझोल २५ इसी १ लिटर या बुरशीनाशकांची प्रती हेक्टरी १ooo लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकाची काढणी, मळणी व उत्पादन :
जेव्हा झाडावरील पाने पिवळी पडून गळल्यानंतर आणि ९५ टक्के शेंगा तपकिरी रंगाच्या झाल्यावर काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगा झाडावरच तडकून बी बाहेर पडते व उत्पादनाचे नुकसान होते. काढणी केल्यानंतर मळणीयंत्राच्या सहाय्याने मळणी करून घ्यावी.
उत्पादन : सोयाबीनपासून हेक्टरी २५ ते ३० किंटल उत्पादन मिळते.
#शेती व्यवसाय हा दिवस रात्र एक करून
केलेला व्यवसाय आहे
पेरणी ते काढणी पर्यंतचा प्रवास काय सुखाचा नाही
कृषीकन्या
✍️वैष्णवी संजयराव निमकर
७६६४४१७९९
Bsc (Hons) Agriculture 💚
नाद एकच शेती ❤️
Comments
Post a Comment