कपाशी पिकातील पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे व उपयांविषयी
कपाशी पिकातील पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे व उपयांविषयी (Symptoms and Remedies of Nutrient Deficiency in Cotton Crop):
Life cycle of Cotton plant
Leaves of cotton
नायट्रोजनची कमतरता (Nitrogen Deficiency):
✓कपाशी पिकाची सर्व पाने पिवळ्या रंगाची होतात, गळतात.
✓कपाशी पिकाची वाढ थांबते.
जुनी पाने पक्व होण्याच्या अगोदरचं वाळून जातात.
उपायः
✓40% Nitrogen (इफको-युरीया) 100 ग्रॅम किंवा
✓19:19:19 (देहात न्यूट्री - NPK) 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
फॉस्फरसची कमतरता (Phosphorus Deficiency):
✓फॉस्फरसच्या कमतरतेमुळे कपाशीचे पीक बटू होते.
✓शाखांचे प्रमाण कमी होते.
✓पानांचा रंग हिरवा, निळा, होतो आणि पानांची वाढ थांबून पाने अखूड (अरुंद) राहतात
उपाय:
1)18:46:0 (ईफको-डी.ए.पी.) 100 ग्रॅम किंवा
2)
12:61:00 (देहात न्यूट्री - MAP) 75 ग्रॅम किंवा
3)00:52:34 (देहात न्यूट्री - MKP) 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.
पोटॅशिअम कमतरता (Potassium Deficiency):
✓वाढ चांगली होत नाही.
✓जुनी पाने पिवळी पडुन किनाऱ्यावर कोरडी पडतात आणि नारंगी, पिवळा रंग जुन्या पानांमध्ये दिसु लागतो ज्यात अनेक क्लोरोटिक स्पॉट विकसित होतात जे नंतर मृत, तपकिरी होतात.
झिंक कमतरता (Zinc Deficiency):
✓जस्ताच्या कमतरतेमुळे पानामध्ये रंगद्रव्यांचा विकास न करण्याची प्रवृत्ती दिसून येते.
✓मुख्य शिरांबरोबर हरीतद्रव्याचे नुकसान झाल्यामुळे सफेद पट्टे पडल्यासारखे दिसतात.
✓जास्त प्रमाणामध्ये जस्ताची कामतरता असल्यास पेशीसमूहाचा काही भाग मृत होतो आणि पेशींची वाढ थांबते.
✓पाने लहान होतात आणि वर वळतात आणि कपाचा आकार घेतात, पीक झुडुपासारखे दिसते.
उपाय:
शेणखतासोबत झिंक सल्फेट मोनोहायड्रेट (देहात न्यूट्री - ZnSO4) 5 ते 7 किलो प्रति
लोह कमतरता (Iron Deficiency):
लोह कमतरतेची लक्षणे साधारणपणे नवीन पानावरती दिसून येतात.
1) हरीतद्रव्यांचे प्रमाण कमी होते व फिक्कट पट्टे समांतर ओळींमधून दिसतात.
2)जास्त प्रमाणामध्ये कमतरता असल्यास नवी पाने शिरांसह पूर्णपणे पांढरी पडतात व मुळांची वाढ देखील खुंटते.
उपायः
शेणखतासोबत फेरस सल्फेट (देहात न्यूट्री - FeSo4) 5 किलो प्रति एकरी द्यावे.
Zn12%-EDTA (देहात न्यूट्री - Zn12%) 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे.
बोरॉनची कमतरता Boron Deficiency):
✓पानांचा आकार विकृत होतो.
✓कळ्यांचे प्रमाण कमी होते.
✓फुले व बिया कमी प्रमाणात तयार होतात.
✓बोरॉन हा परागकणांसाठी आवश्यक घटक असल्यामुळे फुलांमधील फलन प्रक्रिया विस्कळीत होते.
✓अर्धी पिकलेली बोंड पडू लागतात.
✓नवीन कळ्या तयार होणे थांबते, वाढीचा भाग कोमेजून जातो आणि डायबॅकमुळे सुकतो.
उपाय:
✓बेसल डोस देताना चेलट्स बोरॉन 20% (देहात न्यूट्री - बोरॉन 20%) 2 किलो प्रति एकरी द्यावे.
✓चेलट्स बोरॉन 20% (देहात न्यूट्री - बोरॉन 20%) हे 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा 500 ग्रॅम प्रति एकरी ड्रीप मधून 7 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा सोडावे.
Agricos 🌾
✍️वैष्णवी निमकर
B. Sc ( Hons) Agriculture
Comments
Post a Comment