पपई फळबाग लागवड तंत्रज्ञान


पपई लागवडीची प्रमुख तंत्रे:

पपईची लागवड कधी करतात

पपईची लागवड ही वर्षातून तीन वेळा करता येते. ते म्हणजे 
✓जून-जुलै, 
✓सप्टेंबर-ऑक्‍टोबर किंवा 
✓फेब्रुवारी-मार्च दरम्यान.

जमीन आणि हवामान:
जमीन: पपई लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. 

हवामान: उष्ण आणि दमट हवामान पपईच्या वाढीसाठी चांगले असते. 

लागवडीची वेळ:
✓पावसाळ्याच्या सुरुवातीला, म्हणजेच जून-जुलैमध्ये लागवड करणे फायदेशीर ठरते. 

✓तसेच, हवामान अनुकूल असल्यास फेब्रुवारी-मार्चमध्येही लागवड करता येते. 


रोपे तयार करणे:

✓पपईची रोपे बियांपासून किंवा सुधारित जातींच्या कलमांपासून तयार करता येतात. 

✓प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून रोपे तयार केल्यास जास्त अंकुरण होते. 

लागवड पद्धत:

✓रोपे लावताना गादीवाफे तयार करून त्यावर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. 
✓जातीनुसार एका खड्ड्यात एक किंवा तीन रोपे लावावी लागतात, जसे की व्दिलिंगी जातीला एक आणि एकलिंगी जातीला तीन रोपे. 

पपईच्या जाती

पपईच्या अनेक जाती आहे त्यामध्ये

✓कॉरग मध दव (रियल सीड्स)

✓तैवान 6 786 (रेड लेडी): (नो यु सीड्स)

✓रेड बेबी हायब्रीड (नो यु सीड्स)

✓ग्रीन बेरी/ रास्पबेरी- (औस इको वेल)

✓एक्सप -15 (नो यु सीड्स) या जाती उत्तम मानल्या जातात.

आंतरपीक

शेतात पहिल्या सहा महिन्यांमध्ये भाजीपाला लावावा. पपई मध्ये अंतरपीक घेतल्याचा दुहेरी फायदा होतो. विशेषत: तणांचे प्रमाण कमी होते; आणि आर्थिक फायदापण होतो.
Ginger + Papaya
Papaya + Marigold


खत व्यवस्थापन

ज्या क्षेत्रामध्ये पपईची लागवड करायची आहे त्या क्षेत्रामध्ये आडवी उभी नांगरणी करताना प्रति हेक्टरी वीस टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत मिसळावे.

✓लागवडीवेळी युरिया 110 ग्रॅम, DAP 110 ग्रॅम, MoP 80 ग्रॅम द्यावे.

लागवडीनंतर तिसऱ्या महिन्यात युरिया 110 ग्रॅम, DAP 110 ग्रॅम, MoP 80 ग्रॅम द्यावे.

लागवडीनंतर पाचव्या महिन्यात युरिया 110 ग्रॅम, DAP 110 ग्रॅम, MoP 80 ग्रॅम द्यावे.

लागवडीनंतर सातव्या महिन्यात युरिया 110 ग्रॅम, DAP 110 ग्रॅम, MoP 80 ग्रॅम प्रति झाड द्यावे.

पाणी व्यवस्थापन

✓पपई ला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. 

✓जास्त पाण्यामुळे पपईची मुळे कुजतात. आणि खूप लवकर कीड व रोगाचा प्रादुर्भाव होतो. 

✓ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे पपई बागेतील पाण्याचा निचरा उत्तम राहतो. आणि गरजेइतकेच पाणी दिल्याने पपई जास्त निरोगी व जोमदार वाढते. 

✓दर्जेदार व वजनदार फळे मिळतात. झाडाच्या दोन्ही बाजूला एक फूट अंतरावर ठिबक इमिटर बसवावेत.

✓ दररोज दर झाडाला बारा लिटर पाणी मिळेल तीन महिन्यानंतर हे प्रमाण वाढवत जावे.

काढणी

✓लागवडीनंतर 9 ते 10 महिन्यांनी पपई ची फळे काढणी योग्य होतात. 

✓पपईच्या झाडाला वर्षभर फळे लागत असतात. त्यामुळे एकाच वेळी सर्व फळांची काढणी करता येत नाही. 

✓फळांची तोडणी करताना फळे देठांसह तोडावीत. फळे पूर्ण तयार झाल्यावर काढल्यास चव उत्तम मिळते. परंतु 

✓लांबच्या बाजारपेठांसाठी पूर्ण वाढलेली फिक्कट हिरवी आणि कडक फळे काढावीत.

उत्पादन

✓एका झाडापासून प्रत्तेक वर्षाला 70-80 फळे मिळतात.
✓फळांचे वजन साधारणतः 500 ग्रॅम ते 3 किलो असते. म्हणजेच दर एकरी दरवर्षी सरासरी 12-15 टन उत्पादन मिळते.
कृषीकन्या
✍️वैष्णवी निमकर 
B.Sc ( Hons) Agriculture ❤️ 
नाद एकच शेती 💚 

Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

रानभाज्या

सर्पदंश 🐍