सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान
१) खरीप
२)रब्बी व
३)उन्हाळी
या तीनही हंगामात हमखास येणारे पीक असून हे पिक कमी कालावधीत येते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच सुधारित वाणांचा वापर करून शेतकरी सुर्यफुलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेवू शकतात.
जमीन -
✓सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
✓हे पिक आम्लयुक्त व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
✓जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या घ्याव्यात.
पेरणीची वेळ -
✓रब्बी हंगामात ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी.
✓ पेरणी शक्यतो टोकण पद्धतीने करावी.
✓उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये पेरणी करावी.
पेरणी पद्धत
✓जिरायती सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्यांच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते.
✓बियाणे 5 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये.
पेरणीनंतर पाणी देण्याच्या दृष्टीने सारे पाडून घ्यावेत.
✓बागायती पिकाची लागवड सरी, वरंबा वरंब्यावर टोकण पद्धतीने केल्यास फायद्याचे ठरते
बियाणे -
सूर्यफुलाचे पेरणीसाठी सुधारित वाणाचे 8-10 किलो तर संकरित वाणाचे 5-6 किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.
•बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी, प्रति किलो बियाण्यांसाठी.
✓मर रोग प्रतिबंधासाठी - 2 ते 2.5 ग्रॅम थायरम
✓केवडा रोग प्रतिबंधासाठी - 6 ग्रॅम मेटॅलॅक्झील (35 एसडी)
✓विषाणूजन्य नेक्रॉसीस रोगाच्या प्रतिबंधासाठी - इमिडाक्लोप्रिड (70 डब्ल्यू.ए.) 5 ग्रॅम. (बियाण्याला संबंधित कीटकनाशकाची प्रक्रिया केली आहे का, याची खात्री करावी. बियाणे पाकिटावर या संबंधी उल्लेख दिलेला असतो.)
✓शिफारशीत कालावधीनंतर ऍझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत 25 ग्रॅम.
संकरित वाण -
एनएच-१, बीएसएस-११, एपीएसएस-११.
सुधारित वाण :
शारदा, आनेगीरी, नारी-६, परभणी कुसुम, परभणी-80, एसएस.५६ मॉडर्न, सुर्या, सनराइज सिलेक्शन, भानु, पिकेव्हीएसएच-२७, पिकेव्हीएसएच-९५२, केबीएसएच-१, केबीएसएच-४४, डिआरएसएच-१, एमएसएफएच-८, एमएसएफएच-१७, फुले रविराज, एलएसएफएच-१७१,
आंतरपीक -
✓आंतर पीक पद्धतीमध्ये भुईमूग + सूर्यफूल पेरणी करावी.
✓पेरणीचे अंतर मध्यम ते खोल जमीनीसाठी ४५ x ३0 सें.मी.अंतर ठेवावे
✓भारी जमिनीसाठी ६0 × ३0 सें.मी.अंतर ठेवावे
✓संकरित वाणसाठी 60 × ३0 सें.मी. पेरणीचे अंतर ठेवावे.
रासायनिक खते -
पेरणीपूर्वी प्रती हेक्टर २.५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतामध्ये चांगले मिसळावे, बागायती पिकास हेक्टरी ६० किलो नत्र, ३0 किलो स्फुरद व ३0 किलो पालाश द्यावे. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी गांडूळ खत, शेणखत अथवा कंपोस्ट खतातून द्यावे.
आंतरमशागत
✓पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी दोन रोपांतील अंतर 30 सें.मी. ठेवून विरळणी करावी.
✓पेरणीनंतर 15 दिवसांनी एक खुरपणी करावी.
तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली
✓कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी व दुसरी कोळपणी 35 ते 40 दिवसांनी करावी
पाणी व्यवस्थापन
१)सूर्यफुलाच्या पिकास रोप अवस्था,
२)फुलकळी अवस्था,
३)फुलोऱ्याची अवस्था,
४)दाणे भरण्याची अवस्था
या चार संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.
फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.
जैविक किड नियंत्रण -
सूर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी एचएनपीव्ही या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.
काढणी - सूर्यफुलाची पाने, देठ व फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी. कणसे चांगली वाळताना नंतर मळणी करावी.
उत्पादन - बागायती सूर्यफुलापासून प्रतिहेक्टरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळते.
✍️ Agricos 🌾
vaishnavi Nimkar
BSc agri 🌾💚
नाद एकच शेती ❤️ ⚔️
Comments
Post a Comment