आले पिकातील कंदकुंज रोग
आल्याच्या पिकातील कंदकुंज रोग हा प्रामुख्याने पिथियम (Pythium) आणि फ्युजॅरियम (Fusarium) बुरशीमुळे होतो,
तसेच बुरशी, सुत्रकृमी आणि कंदमाशी (Rhizome fly) यांमुळेदेखील हा रोग पसरतो.
*या रोगाचे मुख्य कारण म्हणजे जमिनीत पाणी साचून राहणे आणि हवेतील आर्द्रता वाढणे.
✓या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी पिकात बुरशीनाशक फवारणी करणे, पाण्याचा योग्य निचरा करणे आणि पिकाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
•कंदकूज रोगाची लक्षणे:
✓पाने पिवळी पडतात आणि कडेने वाळून खाली पडतात.
✓खोडांचा जमिनीलगतचा भाग काळपट-राखाडी होतो.
✓कंद (गाठी) काळे आणि निस्तेज दिसतात.
प्रादुर्भाव जास्त झाल्यास कंदामधून
✓दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येते.
1. बुरशीनाशकांचा वापर:
लागवडीपूर्वी बियाण्यांवर कार्बेन्डाझिम सारख्या बुरशीनाशकांची प्रक्रिया करावी.
2. पाण्याचा निचरा:
शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, कारण यामुळे बुरशीची वाढ होते.
3. पिकांचे नियोजन:h
योग्य वेळी पीक नियोजन केल्यास आणि रोगट कंद काढून टाकल्यास रोगाचा प्रसार थांबतो.
4. जैविक नियंत्रण:
काही शेतकरी जैविक घटक वापरून या रोगावर नियंत्रण मिळवतात.
5. हवामान नियंत्रण:
कंदमाशीचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात जास्त असतो, त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
✓याच्या नियंत्रणासाठी सुडोमोनास @१ किलो आणि ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति एकरी जमिनीद्वारे किंवा ठिबक उपलब्ध असल्यास ठिबकद्वारे द्यावे.
✓ तसेच रासायनिक पद्धतीच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीटक व बुरशीनाशके वापरावीत
प्रतिबंधात्मक उपाय
कंद कुज प्रतिबंधासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस दोन ते अडीच किलो प्रति एकरी 250 ते 300 किलो सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावे.
कंद कुजण्यास सुरुवात झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड चार ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.
मॅटॅलॅक्सिल+ मॅन्कोझेब या संयुक्त बुरशीनाशक चार ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.
Bsc agriculture
नाद एकच शेती 💚 ⚔️
Comments
Post a Comment