पिवळ्या मोझॅक (केवडा)

पिवळ्या मोझॅक (केवडा) 

रोगाच्या व्यवस्थापनासाठी
 ✓रोगप्रतिकारक वाणांची निवड करणे,
✓ पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे 
✓आणि रोगट झाडे वेळेत उपसून नष्ट करणे हे महत्त्वाचे उपाय आहेत. 

याशिवाय, 
✓निरोगी बियाण्यांचा वापर करणे, 
✓तणमुक्त शेती राखणे, .
✓पिवळे चिकट सापळे लावणे आणि
✓ गरजेनुसार शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करणे या उपायांनी रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

रोगाचा प्रसार
पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगास कारणीभूत असलेला मुंगबीन यलो मोझॅक याचा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीव्दारे केला जातो. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.
 लक्षणे (Symptoms):

१)पानांवर पिवळे ठिपके किंवा पट्टे दिसतात. 

२)पानांचा रंग पिवळा पडून त्यांची वाढ खुंटते. 

३)पाने अरुंद होऊन मुरगळलेली दिसू शकतात. 

४रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडांची वाढ थांबते, फुलांची आणि शेंगांची संख्या कमी होते आणि दाणे पोचट राहतात, ज्यामुळे उत्पादनात घट येते. 

2. यांत्रिक उपाय
रोगग्रस्त झाडे काढून टाकणे: शेतात रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, रोगग्रस्त झाडे मुळासकट उपसून नष्ट करावीत.

3. रासायनिक उपाय
बीजप्रक्रिया:
 थायोमिथाक्झाम ३०% एफ.एस. या कीटकनाशकाची १० मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

फवारणी: पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी अ‍ॅसिटामिप्रिड २५% अधिक बायफेनथ्रीन २५% डब्ल्यु.जी. या कीटकनाशकाची ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड १७% एसएल (२.५ मिली प्रति १० लिटर पाणी) किंवा थामोमिथोक्झाम २५% जी डब्ल्यू (३ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) यापैकी योग्य कीटकनाशकाची फवारणी करावी

HomeShopAgriculturePower Up
🔍
Power Up
Power Up

– पॉवर अप हे अल्जेनिक ऍसिड, अमिनो ऍसिड, हायड्रोलायझ्ड प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचे मिश्रण आहे.

– पॉवर अप हे प्रथिन संश्लेषणाचे नैसर्गिक बिल्डिंग ब्लॉक आहे. ते १४ आवश्यक अमिनो ऍसिड प्रदान करते जे प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असतात. 

✓फळ बसवणे आणि नवीन पेशींच्या विकासासाठी आवश्यक असलेले प्रथिने, फुले येण्यास प्रवृत्त करते आणि पूर्व गळणे कमी करते, फळांचा आकार आणि पिकांची गुणवत्ता सुधारते, पोषण शोषण आणि थायर वापर सुधारते

✓पॉवर अप वनस्पतींमध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढवते.
कृषीकन्या 
✍️Vaishnavi Nimkar 🌾
नाद एकच शेती 💚 ⚔️ 


Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

सर्पदंश 🐍

रानभाज्या