घेवडा लागवड तंत्रज्ञान
घेवड्याची मुख्य वैशिष्ट्ये
प्रकार:
घेवड्याला उत्तर भारतात 'राजमा' असेही म्हणतात. तसेच, शेंगांच्या आकारावरून याला घेवडा, श्रावण घेवडा, फरसबी अशा विविध नावांनी ओळखले जाते.
✓महाराष्ट्रामध्ये अंदाजे 31050 हेक्टर क्षेत्रावर श्रावणी घेवडयाची लागवड होते. घेवडयाच्या कोवळया शेंगाची भाजी तसेच सुकलेल्या दाण्यांची उसळ लोकप्रिय आहे.
✓घेवडयांच्या पानाचा उपयोग जनावरांच्या चा-यासाठी करता येतो.
✓ शेंगामध्ये अ आणि ब जीवनसत्व तसेच खनिजे, लोह आणि चुना तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
उपयोग:
घेवड्याच्या हिरव्या शेंगा भाजी म्हणून तर वाळलेल्या बियांपासून उसळ बनवली जाते.
लागवडीचा कालावधी:
हे पीक कमी दिवसांत तयार होते आणि वर्षभर त्याची मागणी असते.
लागवडीसाठी उपयुक्त जिल्हे
महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
हे पीक कमी दिवसात अधिक उत्पन्न देते.
लागवड हंगाम
महाराष्ट्रात या पिकाची लागवड तीनही हंगामात होते.
✓खरीप हंगामासाठी जून, जूलै महिन्यात रब्बी हंगामासाठी सप्टेबर ऑक्टोबर महिन्यात आणि
उन्हाळी हंगामात जानेवारी, फेब्रूवारी महिन्यात घेवडयाची लागवड करतात.
•वाण
घेवडयाच्या कटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, व्ही.एल., 5 जंपा, पंत अनुपमा, फूले सुयश या प्रकारच्या जाती लागवडीयोग्य आहेत.
•बियाण्याचे प्रमाण
प्रति हेक्टरी 40 किलो बियाणे लागते.
✓ टोकन पध्दतीने लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 किलो बी लागते
पूर्वमशागत
जमीनीची उभी आडवी नांगरट करून, कुळवाच्या पाळया देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत 40 ते 45 बैलगाडया हेक्टरी या प्रमाणात शेणखत मिसळावे.
लागवड
घेवड्याचे फायदे
कमी खर्च:
या पिकाला कमी खर्च आणि श्रम लागतात.
उत्पन्न:
कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळते.
वर्षभर मागणी:
वर्षभर या पिकाची बाजारात मागणी असल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळतात
भारत सरकार
MeitY Logo
Vikaspedia
language-menuम
शेती
घेवडा
घेवडा
योगदानकर्ते
: राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था
08/02/2020
विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.
आंतरमशागत
रोग व किड
उत्पादन
प्रस्तावना
उत्तर भारतामध्ये घेवडयाला राजमा म्हणतात. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारे पिक आहे. महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्यादी जिल्हयांमध्ये श्रावण घेवडयाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 31050 हेक्टर क्षेत्रावर श्रावणी घेवडयाची लागवड होते. घेवडयाच्या कोवळया शेंगाची भाजी तसेच सुकलेल्या दाण्यांची उसळ लोकप्रिय आहे. घेवडयांच्या पानाचा उपयोग जनावरांच्या चा-यासाठी करता येतो. शेंगामध्ये अ आणि ब जीवनसत्व तसेच खनिजे, लोह आणि चुना तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
जमिन व हवामान
घेवडा हेक्टरी पिक हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याचा निचरा असणा-या जमिनीत उत्तम प्रकारे येते.
✓अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते. परंतु शेंगा कमी लागतात.
✓जमिनीचा सामु 5.5 ते 6 च्या दरम्यान असावा. घेवडा हेक्टरी थंड हवामानात आणि
✓पावसाळयात येणारे पिक असून 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमानात हेक्टरी पिक चांगले येते. अतिथंडी व अतिउष्ण हवामान या पिकास मानवत नाही.
लागवड
खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा तिफणीने पहिला पाऊस पडून गेल्यावर, जमिन वाफश्यावर आल्यावर करावी.
पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 45 सेमी आणि दोन झाडातील अंतर 30 सेमी ठेवावे. यानंतर विरळणी करून दोन झाडात 30 सेमी अंतर ठेवावे
बिया टोकन पध्दतीने 2 ते 3 सेमी खोलीवर पेराव्यात. उन्हाळी हंगामात बियांची पेरणी 60 ते 70 सेमी अंतरावर सरी वरंब्यावर करावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूला बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर 2 ते 3 बिया टोकाव्यात.
खते व पाणी व्यवस्थापन
सर्वसाधारणपणे हेक्टरी 720 किलो बियाण्याचे आणि 630 किलो पाल्याचे उत्पादन देणा-या घेवडयाचे पीक जमिनीतून 66 किलो नत्र 27 किलो स्फूरद आणि 55 किलो पालाश शोषून घेते. यावरून घेवडयाच्या पिकाला जमिनीतून लागणा-या मुख्य अन्नघटकाची आवश्यकता लक्षात येते.
निरनिराळया प्रयोगावरून घेवडयाच्या पिकाला शेणखत आणि रासायनिक खतांच्या पुढील मात्रांची शिफारस करण्यात आली आहे.
घेवडयाच्या पिकाला 40 टन शेणखत, 50 ते 54 किलो नत्र 50 ते 100 किलो स्फुरद आणि 50 ते 110 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. स्फूद आणि पालाश पूर्ण आणि अर्धा नत्र पेरणीच्या वेळी द्यावा आणि उरलेला अर्धा नत्र बी उगवल्यानंतर तीन ते चार आठवडयांनी द्यावा.
•घेवडयाच्या पिकाची मुळे जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे पिकाला जास्त पाणी दिल्यास ते मुळांना अपायकारक ठरते. मात्र फूलो-याच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते. म्हणून घेवडयाच्या पिकाला फूले येण्याआधी पाणी द्यावे.
•तसेच पावसाळयात जमिनितील पाण्याचा निचरा होणे आवश्यक असते. खरीप हंगामातील घेवडयाच्या पिकाला पाणी देण्यात आवश्यकता भासत नाही. परंतू पाऊस नसल्यास पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे.
• उन्हाळी हंगामातील पिकाला 8 ते 10 दिवसांच्या अंतराने आणि जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळया द्याव्यात.
आंतरमशागत
खरीप हंगामात पिकाची पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. खरीप हंगामात तणांचा योग्य वेळी बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
1 ते 2 खुरपण्या देऊन तण काढावे किंवा पेरणीपूर्वी तणनाशकाची फवारणी करावी. खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आणि योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
Bsc agri
Agri advisor
KSP BiO Pune
Comments
Post a Comment