सूर्यफुल लागवड तंत्रज्ञान


जमीन : या पिकासाठी योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.

पूर्वमशागत : पिकाच्या वाढीसाठी चांगली भुसभुशीत जमीन तयार करावी.

हलकी जमीन : नांगरणी, वखरणी, फळी फिरवून ढेकळे फोडावीत.

मध्यम जमीन : २-३ कुळवाच्या पाळ्या जमिनीत सुयोग्य वाफसा असताना केल्यास पुरेशा होतात



अ.क्र. वाण कालावधी वैशिष्ट्ये
मॉडर्न ७५-८० दिवस लवकर पक्क होणारा , कोरडवाहू लागवडीस योग्य

एस.एस.५६ ८०-८५- दिवस अधिक उत्पादकता,कोरडवाहू लागवडीस योग्य

ई. सी-६८४१४ १०० -११० दिवस अधिक उत्पादन , उशिरा पेरणीस योग्य , खरीपासाठी चांगला
भानू ८५-९० दिवस सर्व हंगामासाठी तसेच अवर्षण प्रवण विभागासाठी चांगला
संकरित वाण

अ.क्र. वाण कालावधी वैशिष्ट्ये
के.बी.एस.एच.-१ ९०-९५०दिवस तेलाचे प्रमाण अधिक
एल.डी.एम.आर.एस.एच.-१७ ८५-९० दिवस केवडा रोगास प्रतिकारक्षम , लवकर येणारा वाण
एस.एस.एफ.एच.-१७ १००-१०५ दिवस अधिक उत्पादनक्षमता
के.बी.एस.एच.-४४ ९०-९५ दिवस अधिक उत्पादनक्षमता
फुले रविराज ९० -९५ दिवस अधिक उत्पादनक्षम , उशिरा पेरणीस योग्य , बडनेक्रोसीस रोगास प्रतिकारक
हंगाम
सूर्यफुलाचे पिक जरी वर्षभर म्हणजे तिन्ही हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ हि पाण्याची उपलब्धता पाहून निश्चित करावी लागते.कारण सूर्यफुलाला पाण्याचा तान सहन होत नाही . तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाने भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही , याचे नियोजन करावे . कारण या दोन्हीही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणाऱ्या आहेत.




 

व्यवस्थापन त्याचबरोबरीने परागीभवन वाढविण्यासाठी योग्य ते नियोजन, पक्षांपासून संरक्षण तसेच वेळेवर काढणी इ. गोष्टींचा सुयोग्य विचार होणे आवश्यक आहे.

सूर्यफूलात तेलाचे प्रमाण ३८ ते ४५ टक्के इतके असते तर प्रथिनांचे प्रमाण १४ ते १९ टक्के असते. जास्त लिनोलिक आम्लाचे प्रमाण तसेच अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसीड असल्यामुळे तेल जास्त काळ टिकते व जास्त ऑक्सिडेटीव्ह स्टॅबिलीटीमुळे तळण्यासाठी चांगले म्हणून सूर्यफूल तेलास आहारात महत्वाचे स्थान आहे.

हवामान : सूर्यफूल हे पीक वर्षभर घेता येणारे पीक आहे. वर्षभरातील हवामान मानवून घेणारे पीक म्हणून सर्व हंगामात घेता येते.

जमीन : या पिकासाठी योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.

पूर्वमशागत : पिकाच्या वाढीसाठी चांगली भुसभुशीत जमीन तयार करावी.

हलकी जमीन : नांगरणी, वखरणी, फळी फिरवून ढेकळे फोडावीत.

मध्यम जमीन : २-३ कुळवाच्या पाळ्या जमिनीत सुयोग्य वाफसा असताना केल्यास पुरेशा होतात.



हंगाम जमीन पेरणीची वेळ
✓खरीप हलकी १५ जून ते १५ जुलै
✓भारी १५ ऑगस्ट पर्यंत पेरणी करता येते
✓रब्बी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
उन्हाळी जानेवारीचा पहिला आठवडा ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा

बियाणे, बीजप्रक्रिया आणि पेरणी

अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी योग्य हेक्टरी झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. त्यासाठी सुधारित व संकरित जातीचे बियाणे योग्य प्रमाणात वापरावे.

वाण कोरडवाहू (कि./हे.) बागायती (कि./हे.)
सुधारित ८-१०- ६-७
संकरित ५-६ ४-५

✓बियांच्या लवकर उगवणीसाठी पेरणीपूर्वी बियाणे १२-१४ तास पाण्यात भिजवून सावलीत वाळवावे. 

✓बियाण्यास २-३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.

✓ सूर्यफुलाची पेरणी जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या अंतरावर पेरणीयंत्राच्या सहाय्याने करावी. 

✓टोकण पद्धतीने सुध्दा सूर्यफूल पेरता येते व बियाण्याची बचत होते. सूर्यफूल ५ सें.मी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

जमीन पेरणीचे अंतर हेक्टरी झाडांची संख्या
हलकी ४५*२० से.मी. ११११११
मध्यम ४५*३० से.मी. ७४०७४
भारी ६०*३० से.मी. ५५५५५

खत व्यवस्थापन
सूर्यफुलाचे पीक हे रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देत असल्याने संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 

सूर्यफुलास नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सल्फर या अन्नद्रव्यांची गरज आहे.

अन्द्रव्य कोरडवाहू (कि./हे.) बागायती (कि./हे.)
पेरणीच्या वेळी पेरणीनंतर ३० दिवसांनी पेरणीच्या वेळी पेरणीनंतर ३० दिवसांनी
नत्र २५ २५ ३० ३०
स्फुरद २५ ३० 
पालाश २५ ३० 
सल्फर २५ ३० 
✍️Vaishnavi Nimkar 💚 
Bsc agri 


Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

सर्पदंश 🐍

रानभाज्या