ढेमसे लागवड तंत्रज्ञान

ढेमसेही एक लोकप्रिय उन्हाळी फळभाजी आहे.या फळ भाजीला टिंडा या नावानेदेखील ओळखले जाते. 

परंतु बरेचसे शेतकरी या पिकाची लागवड करीत नाही.परंतु वर्षभर याला सतत मार्केटमध्ये मागणी असते.या लेखामध्ये आपण ढेमसे लागवड तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत.
ढेमसे लागवड तंत्रज्ञान

जमीन व हवामान:
या पिकासाठी सर्वसाधारणपणे हलकी ते मध्यम काळी जमिन लागते.

परंतु हलकी जमीन जर असली तरी या पिकास चांगली असते. या पिकाची लागवड वर्षातील बाराही महिन्यात केव्हाही करता येते.

अति उष्ण व दमट हवामान या पिकास मानवत नाही. त्यासाठी कोरडे हवामान या पिकांना उत्तम असते.
ढेमसे जाती व बियाने:

महोदया टिंडा, महिको एम टी एन एच 1,अण्णामलाई इत्यादी बियाणे वापरावे. 
एका एकरासाठी दोन किलो बियाणे पुरेसे होते. 

या बियाण्याचे कवच इतर पिकांच्या बिया पेक्षा कडक असल्याने उगवण फार कमी होते. 

त्यासाठी एक लिटर पाणी कोमट करून त्यात 500 पिली गोमूत्र टाकून एक किलो बी रात्रभर भिजत ठेवावे.नंतर सावलीत सुकवून लावावे.


लागवड पद्धत:

हलक्‍या जमिनीत लागवड करायची असेल तर तीन बाय दोन फूट अंतर ठेवावे व जमीन चांगली असेल तर आंतर पाच बाय दोन फूट ठेवावे.

भारी असलेल्या जमिनीत वेलांची वाढ भरपूर होते. 

 बी लावताना सुरुवातीला ह्युमिक 98 टक्के सेंद्रिय खत एक एक चमचा टाकून त्यात बी लावावे. त्याने जमीन भुसभुशीत होऊन जारवा व वेल वाढीस मदत होते.

खत व पाणी व्यवस्थापन:

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या पिकास रासायनिक खत देऊ नये. रासायनिक खत वापरल्यानेया पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. 

या पिकासाठी शेण खत उत्तम असते.उन्हाळ्यात सात ते आठ दिवसांच्या अंतराने सकाळी नऊच्या आत पाणी द्या. थंडित आठ ते दहा दिवसांच्या अंतराने सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत पाणी द्यावे. 

पाणी देताना भिजपाणी न देता हलकेसे पाणी द्यावे.

रोग व्यवस्थापन

या पिकामध्ये प्रामुख्याने पांढरी माशी, फळमाशी व भुंगे इत्यादी किडींचा प्रादुर्भाव जाणवतो. 

हेपिक वेलवर्गीय असल्याने वेलांची वाढ जमिनीलगत पसरत असते. 

तसेच पाणी केसाळ लवयुक्त, मऊ असल्याने थंडीतील दव, धुके पानावर पडून बुरशी येते. 

उन्हाळ्यात वातावरणातील उष्ण असल्याने पाणी दिल्यानंतर जमीन तापलेली असते. त्यामुळे झाडाला उष्णतेचा चटका बसतो. त्यामुळे बुरशी व करपा या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो.

ढेमस्याची तोडणी व उत्पादन:
साधारण 35 ते 45 दिवसात फुलकळी लागते. 55 ते 60 दिवसांनी तोडणी सुरू होते. 

फळ साधारण सफरचंदाच्या आकाराचे झाल्यावर तोडणी करावी. या अवस्थेत मालाला फिकट हिरवा पोपटी रंग येतो.

 एक किलो मध्येच दहा ते चौदा फळे बसतात. फळे जास्त मोठी न होऊ देता वेळेवर तोडणी करणे फायद्याचे ठरते. 

ढेमसे उत्पादन दोन महिने सहज चालते. तीन दिवसानंतर तोडणी करावी लागते. अशा पंधरा ते वीस तोडणे होतात. सर्व साधारणपणे एकरी पाच ते दहा टन उत्पादन निघते. 

टिंडा भाजीचे आरोग्य फायदे

पचनसंस्थेसाठी उत्तम: टिंड्यामध्ये भरपूर फायबर असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या कमी होतात. 

वजन व्यवस्थापनासाठी उपयुक्त
कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी टिंडा एक उत्तम पर्याय आहे. 
हृदयाचे आरोग्य सुधारते: टिंडा शरीरातील चरबी कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवते: टिंडा व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि संसर्गजन्य रोगांशी लढण्यास मदत करते. 
शरीरातील विषारी घटक बाहेर काढते: या भाजीच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक आणि अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्यास मदत होते. 
शरीराला थंडावा देते: टिंडा शरीराला थंडावा देण्याचे काम करते, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीराला आराम मिळतो. 

त्वचेसाठी लाभदायक: त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचा चमकदार ठेवण्यासाठी देखील टिंडा भाजी फायदेशीर आहे.
 
@Vauishnavi Nimkar
Bsc agriculture 
# नाद एकच शेती 👑 



Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

सर्पदंश 🐍

रानभाज्या