Seaweed Extract
Seaweed
शेवाळ हा जैवशास्त्रीय उत्क्रांतीच्या खूप तळच्या पायदानामधला एक वनस्पतीचा प्रकार आहे. असूक्ष्मजीवी शैवाळाला जरी इंग्रजीत ‘सी-वीड’ (निरुपयोगी रान) असे म्हटले जात असले, तरी त्याचे नानाविध उपयोग आहेत आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेसुद्धा त्याचे योगदान बहुमूल्य आहे. समुद्री परिसंस्थेत या वनस्पती प्राथमिक निर्माता म्हणून आपली भूमिका बजावतात आणि प्रकाश-संश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतःच बनवतात व इतर जीवांच्या उपजीविकेचेही साधन बनतात.
सामान्यतः ही वनस्पती उथळ ते १० मीटर खोल पाण्यात वास्तव्य करते, परंतु नवीन संशोधनानंतर काही प्रकार हे अनेकपट जास्त खोलीमध्येसुद्धा आढळून आले आहेत.
आज जागतिक स्तरावर या वनस्पतीच्या १० हजारपेक्षा अधिक, तर भारतात ९०० पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या रंगद्रव्याच्या आधारावर त्यांचे प्रामुख्याने हरित, लाल आणि तपकिरी शेवाळ अशा ३ प्रमुख गटामध्ये वर्गीकरण केले आहे.
१. हरित शेवाळ २. लाल शेवाळ ३. तपकिरी शेवाळ.
१) हरित शेवाळ (Chlorophyceae) : या गटातील शेवाळांमध्ये क्लोरोफिल हे प्रमुख रंगद्रव्य आढळते. बहुतांश जाती या उथळ पाण्यात व जिथे जास्त खनिज द्रव्ये आढळतात; त्या पाण्यात वास्तव्य करतात. यामधील कित्येक प्रजाती खाण्यायोग्य असून, त्याचा वापर अतिपूर्व आशियाई देशांच्या रोजच्या जेवणात कोशिंबीर किंवा पालेभाजी म्हणून केला जातो.
२) लाल शेवाळ (Rhodophyceae) : यात आर-फायकोएरिथ्रीन आणि आर-फायकोसायनीन नावाची रंगद्रव्ये अधिक प्रमाणात असतात. अतिखोल पण उबदार पाण्यात याचे अधिकतम वास्तव्य आढळते. यातील आगर (आगार) आणि केराजिनान नावाचे घटक औद्योगिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत.
३) तपकिरी शेवाळ (Ochrophyta or Phaeophyta) : या शेवाळात झँथोफिल नावाचे रंगद्रव्य असते. आणि त्यांचे वर्गीकरण ओक्रोफायटा या शास्त्रीय नावाने केले आहे. यामध्ये केल्पसारख्या समुद्रात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या वनस्पतीचा समावेश होतो. यातील अल्जिनेट आणि फ्युकॉइडीन नावाचे घटक ओद्योगिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत.
– समुद्री शैवालमध्ये ७० पेक्षा जास्त खनिजे, जीवनसत्त्वे आणि एंजाइम असतात.
सेंद्रिय शैवाल खतांमध्ये आढळणारे ट्रेस घटक म्हणजे मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त, लोह आणि नायट्रोजन हे सर्व वनस्पतींसाठी फायदेशीर आहेत.
समुद्री शैवाल खतामुळे वनस्पतींच्या मुळांचा मजबूत विकास होऊन पोषक तत्वे आणि पाण्याचे शोषण वाढते आणि क्लोरोफिलची निर्मिती जलद करून वनस्पती वाढीस प्रोत्साहन मिळते.
– सर्व पिकांमध्ये उपयुक्त
प्रमाण :- – ३ मिली प्रति लिटर ,ड्रीप -ड्रेंचिंग १ लिटर प्रति एकर
✍️
कृषीकन्या
वैष्णवी निमकर
.
Comments
Post a Comment