केळी लागवड

Banana Crop : 
केळी हे महत्त्वाचे नगदी पीक. क्षेत्र आणि उत्‍पन्‍नाच्‍या दृष्‍टीने आंब्‍याच्‍या खालोखाल केळीचा नंबर लागतो. तुमच्याकडे खोल काळी जमीन आणि जर मुबलक पाणी असेल तर या पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते.
लागवडीचा हंगाम
केळीची लागवड दोन हंगामात केली जाते. मृग हंगामात म्हणजे जून जुलै या महिन्यात आणि कांदे बाग केळीची लागवड ऑक्‍टोबर महिन्यात करतात. 

कांदे बाग लागवडीपासून मिळणारे उत्पादन मृगबाग लागवडीपासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा कमी असत, पण बाजारभाव मात्र चांगला मिळतो. म्हणजे जास्त उत्पादनासाठी केळी जून जुलै या महिन्यात लावावी. आणि भाव चांगला पाहिजे असेल तर ऑक्टोबर महिन्यात. लागवडीपासून योग्य व्यवस्थापन ठेवले तर चांगले उत्पादन मिळत.  
जमीन, वाण आणि अंतर 

केळीसाठी मध्यम ते भारी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

जमिनीची खोली ६० सेंटीमीटर तर जमिनीचा सामू हा ६.५ ते ८ दरम्यान असावा.

 हे जाणून घेण्यासाठी केळी लागवडीपुर्वी माती परीक्षण जरुन कराव. क्षारयुक्त, चोपण आणि चुनखडीयुक्त जमिनीत केळीची लागवड करू नये. 

केळीच्या झाडास योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा म्हणून दोन ओळींतील अंतर १.५ मीटर बाय १.५ मीटर ठेवावे. या पद्धतीने लागवड केल्यास हेक्‍टरी ४,४४४ झाडे बसतात.

वाण 
लागवडीसाठी श्रीमंती व ग्रॅंड नैन या वाणांची निवड करावी.

लागवड 

केळीची शेती करायला कंद किंवा मूनव्यांची लागवड करावी लागत असते. 

मुनवे म्हणजे खोडाचा अर्धा जमिनीत व अर्धा जमिनीवर आडवा वाढणारा भाग. याचा उपयोग अभिवृद्धीसाठी केला जातो.
कंद किंवा मुनवे निरोगी आणि जातिवंत बागेतून निवडावेत. 

कंद निवडताना काय काळजी घ्यावी?

 तर मुनव्यांचे वय ३ ते ४ महिने असावे. तर कंदाचे वजन ४५० ते ७५० ग्रॅम असावे. 

कंद उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. कंदांवर ३ ते ४ रिंगा ठेवून खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावेत. 

टिश्यू कल्चरच्या रोपांची लागवड करणार असाल तर रोपे एकसारख्या वाढीची १ ते दीड फूट उंचीची आणि किमान ६ ते ७ पाने असलेली असावीत.

खत व्यवस्थापन

आता समजा तुम्ही केळीची लागवड केली, पण या पिकाची काळजी कशी घ्यायची?

केळीसाठी शिफारशीप्रमाणेच खते द्यावीत. केळी लागवड करताना प्रतिझाड पूर्ण कुजलेलं शेणखत ३० किलोकिंवा ५ किलो गांडूळ खत द्यावे.केळी लागवडीच्या वेळी प्रत्येक झाडाला २५ ग्रॅम अॅझोस्पिरीलिअम आणि २५ ग्रॅम पीएसबी द्यावे. 

खते देताना ती बांगडी पद्धतीने म्हणजे झाडाच्या मुळाच्या सानिध्यात गोलाकार पद्धतीने द्यावीत. खताचा कार्यक्षमतेने उपयोग होण्यासाठी मातीमध्ये चर करून खते दिल्यानंतर खते लगेच मातीआड करावीत. फोटो मध्ये दिसत असेल त्याप्रमाणे. 

ऑक्‍टोबर लागवडीच्या झाडांना डिसेंबर, जानेवारी महिन्यांत थंडीच्या दिवसांत जास्त काळजी घ्यावी लागते. त्यासाठी प्रति झाड २०० ते ४०० ग्रॅम निंबोळी पेंड दिल्यास जमिनीत उबदारपणा येतो. 

केळीची विक्री ही व्यापाऱ्याला क्विंटलमध्ये केली जाते. साधारण प्रती क्विटलसाठी ८०० ते ९०० रुपये भाव मिळतो. आखाती देशात केळीला चांगल मार्केट आहे. त्यामुळे केळी एक्सपोर्टसाठीही चांगला वाव आहे.

 निर्यातक्षम केळीला क्विंटलसाठी मागणीनूसार साधारण दोन हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. पण एक्सपोर्ट क्लालिटीच्या केळीची तशी निगाही राखावी लागते.

 निर्यात करायची असेल तर रासायनिक अवशेषमुक्त म्हणजेच रेस्यूड्यूफ्री माल पिकवण्यार भर द्यावा लागतो. महाराष्ट्रातून जळगाव पट्ट्यातून केळीची जास्त प्रमाणात निर्यात होते. कारण या ठिकाणची केळी विशेष चविमुळे प्रसिद्ध आहे.

✍️कृषीकन्या 
Bsc Hons Agriculture

Comments

Popular posts from this blog

आले लागवड तंत्रज्ञान

रानभाज्या

सर्पदंश 🐍